रवी दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची नाहरी गावाला प्रतीक्षा
सोनीपत जिल्ह्यातील जवळपास १५ हजार लोकसंख्येचे नाहरी गाव कुस्तीपटू रवी दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा करीत आहे,
शांत स्वभावाच्या रवीचे वडील राकेश कुमार दहिया हे शेतकरी आहेत. महावीर सिंग (१९८०-मॉस्को, १९८४-लॉस एंजेलिस) आणि अमित दहिया (लंडन-२०१२) यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा रवी हा तिसरा क्रीडापटू आहे.
दोनदा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महावीरला तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांनी ‘तुझी काय इच्छा आहे?’ असे विचारले होते. त्याने मागितल्याप्रमाणे पशुवैद्यकीय रुग्णालय नंतर गावात निर्माण झाले. त्यामुळे रवीने पदक जिंकल्यास चार हजार कुटुंबीयाच्या या गावासाठी काही विकास प्रकल्प मागता येतील, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.
रवीच्या वडिलांनी एक वर्षांसाठी शेत भाडय़ाने घेतले असून, तिथेच ते कसून मेहनत करतात, परंतु रवीच्या सरावात कधीच खंड पडला नाही. मुलाला योग्य आहार मिळावा, म्हणून दूध आणि लोणी घेऊन राकेश दहिया दररोज छत्रसाल स्टेडियमपर्यंतचे ६० किमी अंतर कापतात.