Ind vs SL : सामन्यासह मालिका जिंकण्याची भारताला संधी; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पहाल सामना?
by
Sahyadrilive
July 20, 2021 12:48 PM
शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया आज (मंगळवार) श्रीलंकेविरूद्ध दुसरा वनडे खेळण्यासाठी मैदानात उतरणार असून संघ तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताने पहिला सामना ७ विकेटच्या फरकाने जिंकला. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने ९ विकेट्सवर २६२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने ३६.४ षटकांत लक्ष्य गाठले. कर्णधार म्हणून शिखर धवनने पहिल्याच सामन्यात नाबाद ८६ धावांची खेळी केली.
आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या त्रिकुटाने भारतीय फलंदाजीची धुरा वाहिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या किशन आणि सूर्यकुमार यांनी पहिल्या चेंडूपासून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.