“ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट !’ या गाण्याचा सोशल मीडियावर बोलबाला Copy
भाजपातर्फे कार्यकर्ता महासंपर्क अभियानाला आजपासून सुरूवात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीवर भर
मुंबई : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत थोडासा विरंगुळा म्हणून जवळजवळ सगळेच लोकं सोशल मीडियावर सर्रास अॅक्टिव्ह आहेत. अशातच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक गाण्यांचाही समावेश आहे. असंच एक गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर असो किंवा इंन्स्टा फेसबूकच्या स्टोरीज असो हे गाणं प्रत्येकाच्या स्टेटसवर आपल्याला पहायला मिळतयं “ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याने प्रत्येकाला वेड लावलं आहे. मुख्य म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर युवकांनी सध्याच्या वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर महागाईचे रेट व नेतेमंडळींचे फोटो एडिटिंग करून वाढत्या महागाईला नियंत्रण ठेवण्यासाठी नेतेमंडळींनी लक्ष केंद्रित करावे, असेही सुचवलं जात आहे.
एकंदरीत, सध्या सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर कोरोनाची कमी पण ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ने मात्र धुमाकूळ घातला आहे.हे गाणं गायक उमेश गवळी यांनी म्हटलं आहे. या गाण्याची सोशल मीडियावर सध्या एवढी क्रेझ आहे की, एका मुलाखती दरम्यान उमेश गवळी म्हणाले की, ”या गाण्याचे इन्स्टाग्रामवर अनेक शॉर्ट व्हिडिओ बनवले जात आहेत. तसंच ग्रामीण भागातील व्यक्ती सहज बोलताना देखील “ओ शेठ’ असं बोलून जातो. त्यातून हे गाणं सुचलं आहे असं यासाठी प्रणीत व संध्या या माझ्या सहकाऱ्यांनी म्युझिक दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या गाण्याबद्दल रसिक मायबापांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे,”
असे आहेत गाण्याचे बोल
अशाप्रकारे आहेत गीताचे बोल…
जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या डिमांड आली
ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट…प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर असो किंवा इंन्स्टा फेसबूकच्या स्टोरीज असो हे गाणं प्रत्येकाच्या स्टेटसवर आपल्याला पहायला मिळतयं “ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याने प्रत्येकाला वेड लावलं आहे. मुख्य म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर युवकांनी सध्याच्या वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर महागाईचे रेट व नेतेमंडळींचे फोटो एडिटिंग करून वाढत्या महागाईला नियंत्रण ठेवण्यासाठी नेतेमंडळींनी लक्ष केंद्रित करावे, असेही सुचवलं जात आहे.
एकंदरीत, सध्या सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर कोरोनाची कमी पण ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ने मात्र धुमाकूळ घातला आहे.हे गाणं गायक उमेश गवळी यांनी म्हटलं आहे. या गाण्याची सोशल मीडियावर सध्या एवढी क्रेझ आहे की, एका मुलाखती दरम्यान उमेश गवळी म्हणाले की, ”या गाण्याचे इन्स्टाग्रामवर अनेक शॉर्ट व्हिडिओ बनवले जात आहेत. तसंच ग्रामीण भागातील व्यक्ती सहज बोलताना देखील “ओ शेठ’ असं बोलून जातो. त्यातून हे गाणं सुचलं आहे असं यासाठी प्रणीत व संध्या या माझ्या सहकाऱ्यांनी म्युझिक दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या गाण्याबद्दल रसिक मायबापांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे,”
असे आहेत गाण्याचे बोल
अशाप्रकारे आहेत गीताचे बोल…
जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या डिमांड आली
ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट…