मुंबईचं निर्जंतुकीकरण करण्याच्या मोहिमेत मुंबई महापालिकेला डोमेक्सचा आधार
करोना महामारीची दुसरी लाट शिथील होत असली तरीही अद्याप आपल्याला संक्रमण टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी निर्जंतुकीकरणाद्वारे आपला परिसर आणि घर स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता आहे. अभ्यासानुसार डोमेक्स जंतुनाशक फ्लोअर क्लीनर करोनाव्हायरस नष्ट करतो हे सिद्ध झालं आहे. रुग्णसंख्या वाढत असताना डोमेक्स करोविरोधातील लढाईत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (एमसीजीएम) समर्थनार्थ उभं राहिलं आहे.
डोमेक्सने दिलेल्या या पाठिंब्यासंबंधी बोलताना मुंबई पालिकेचे एल विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांनी म्हटलं आहे की, करोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या सर्वांनाच सुरक्षेत अजिबात हलगर्जी केली जाऊ शकत नाही याची जाणीव करुन दिली आहे. स्वत:ला आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी सावधगिरी बाळगणे आणि सर्व उपाययोजना करणं महत्वाचं आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई पालिका तयार असून डोमेक्सने देणगी आणि निर्जंतुकीकरण मोहीमेच्या माध्यमातून दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण प्रदान करण्यात आणि स्वच्छतेचे चांगले मानक राखण्यास मदत मिळत आहे. आम्हाला खरंच याचं कौतुक आहे.