झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट
सफाईच्या कामाला सुरूवात : नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
पिंपरी – पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर येथे झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. झिका व्हायरस रुग्ण शहराजवळ सापडल्याने आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पावसाळा सुरू झाल्यावर डासांचा प्रादुर्भाव वाढतो. एडिस इजिप्त या जातीचा डास चावल्यावर झिका विषाणूची लागण होत असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. करोना साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपताळीवर राबविली जात आहे. तर दुसरीकडे झिका व्हायरसने डोके वर काढल्याने चिंतेत भर पडली आहे. पुरंदरमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. झिका विषाणूचे लक्षण असलेला रुग्ण अद्याप शहरात आढळलेला नाही. मात्र, पुरंदरमध्ये सापडलेल्या रुग्णामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय जाहीर केला असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. बारावीचा बोर्डाचा जो निकाल लागला आहे, त्याच्या आधारावरच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तुकड्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर ३१ तारखेआधी आमच्याकडे त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत. पण एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठानं घ्यायला हवी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत”, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील प्रभागांची साफसफाई करण्यात येत आहे. त्याठिकाणी औषध व धूर फवारणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांतील परिसराची सफाई करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या छतावर साचणाऱ्या पाण्यामध्ये औषध टाकले जात आहे. जेणेकरून त्याठिकाणी डासांची पैदास होणार नाही. तसेच शहरातील वापरत नसलेल्या कचरा कुंड्या, जीर्ण झालेले टायर, भंगार वस्तू तातडीने हटविण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शहरामध्ये अद्याप झिका विषाणूची लक्षणे कोणत्याही रुग्णामध्ये आढळलेले नाहीत. मात्र, पुरुंदर तालुक्यामध्ये विषाणू सापडल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तसेच याबाबत अलर्ट राहून परिसरात साफसफाई करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
अशी होते झिका विषाणूची लागण
एडिस इजिप्त प्रकारचा डास चावल्यावर झिका विषाणूची लागण होते. या प्रकारच्या डासांमुळे चिकन गुनिया, डेंग्यूसारख्या आजाराची लागण होते. पावसाळ्यात पाण्याचे डबके साचते. या पाण्यावर चार ते पाच दिवसांत डासांची उत्पत्ती होते. एडिस इजिप्त हा डास झिका विषाणू पसरविणारा डास असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
काय आहेत उपाययोजना
- झिका विषाणूची लागण होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना प्रत्येकाने करायला हवी. आपल्या घराच्या आसपास आणि कार्यालयात डासांचा प्रादूर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
- ताप, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, अंग दुखणे आदी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांना विचारल्याशिवाय परस्पर कोणतीही औषधे घेऊ नयेत.
लक्षणे काय आहेत.
- ताप येणे
- डोके दुखणे
- अंगाला पुरळ येणे
- सांधे दुखणे
- सर्व शरीर दुखणे
प्रतिक्रिया…
प्रभागांमध्ये तातडीने साफसफाई केली जात आहे. तसेच आज आम्ही थेरगावला पाहणी केली आहे. अद्याप आपल्याकडे झिका विषाणूची लागण झाली असल्याचे रुग्ण आढळले नाहीत. नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये डासोत्पती होणार नाही यासाठी काळजी घ्यावी. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. तसेच ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी असे कोणतेही आजार अंगावर काढू नये. काही लक्षणे असल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ला घ्यावा.– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी.