करीना कपूरचा दुसरा मुलगा ‘जेह’चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल; चाहते म्हणाले…
अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या ‘प्रेग्नेंसी बाइबल’ या पुस्तकामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ९ जुलैला करीनाचं हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.
अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या ‘प्रेग्नेंसी बाइबल’ या पुस्तकामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ९ जुलैला करीनाचं हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. मात्र त्यानंतर पुस्तकाच्या नावावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. सोशल मीडियावर देखील करीनावर टीका करण्यात आलीय. यातच आता ‘प्रेग्नेंसी बाइबल’ या करीनाच्या पुस्तकातील तिच्या दुसऱ्या मुलाचे फोटो लीक झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर करीना कपूरचे बाळासोबतचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. करीनाच्या या फोटोतील बाळ तिचा दुसरा मुलगा ‘जेह’ असल्याचं म्हंटलं जातंय. शिवाय हे फोटो या पुस्तकातील असल्याच्या चर्चा आहेत. करीनाच्या अनेक फॅन ग्रुपवरदेखील हे फोटो व्हायरल होत आहेत.
करीना आणि सैफने अद्याप त्यांच्या दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूरच ठेवलं आहे. त्यामुळे सैफिनाच्या दुसऱ्या बाळाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशात व्हायरल झालेल्या फोटोंमुळे आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांनी हा चिमुकला ‘जेह’ असल्याचं म्हंटलं आहे.